Advertisement
कामठी– नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने टाटा एस क्र एम एच 40 वाय 9034 ने अवैधरित्या गोमांस वाहून नेत असता खैरी बस स्टॉप जवळ
या वाहनावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना काल रात्री यश प्राप्त झाले असून या धाडीतून 2 किलो गोमांस किमती 2 लक्ष 40 हजार रुपये व जप्त वाहन किमती 3 लक्ष 40 हजार रुपये असा एकुन 5 लक्ष 80 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी वाहनचालकाने संधी साधताच घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले.यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी राजरतन बन्सोड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे दिलीप ढगे, महेश कठाने, धर्मेंद्र राऊत यांनी केले असुन पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे कामठी
Advertisement