आर्किटेक्ट महिलेला उफाळला चेस्ट पेन, रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ , वेळीच मिळाले वैद्यकीय उपचार
नागपूर: आरोग्य चांगले असले तरी घराबाहेर पडल्यावर तो सुखरुप परतेल याची गॅरंटी नाही. कधी, कुठे आणि कोणाला काय होईल, याचा नेमच राहीला नाही. परंतु वेळीच मदतीचा हात मिळाला की, संकट टळते. असाच काहीसा प्रकार आज दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या महिलेला अचानक चेस्ट पेन उफाळला. त्या वेदनेने तळफळू लागल्या. उपस्टेशन व्यवस्थापक मनीष गौर, तिकीट निरीक्षक राजू डाचा यांनी देवदुतासारखे धावून त्यांना मदतीचा हात दिला. वेळीच त्यांना वैद्यकीय उपचार मिळाल्याने संकट टळले. विशेष म्हणजे रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर मंगेश तर मेयो रुग्णालयापर्यंत सोबत गेले.
वर्धेच्या राहणाºया (३५) वर्षीय मनिषा कुट्टेवार या आर्किटेक्ट आहेत. नागपुरातील आर्किटेक्ट सोबत मिळून त्या काम करतात. यासाठी त्यांनी नरेंद्रनगर येथील बाबा पाठक यांच्या घरी भाड्याने कार्यालय घेतले. कार्यालयात इंटिरीर डेकोरटर्ससाठी लागणारे वस्तु ठेवल्या आहेत. कार्यालयात त्या अधून मधून येत असतात. त्यांचे संपूर्ण काम बाहेरच असते. नेहमी प्रमाणे आज सकाळी त्या नागपूरसाठी निघाल्या. नागपूर स्थानकावर गाडी थांबताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. गाडी खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्या फलाटावर पडल्या. एका सज्जन प्रवाशाने त्यांना जनरल वेटिंग हॉलमध्ये बसविले.
या घटनेची सूचना त्यांनी लगेच बाबा पाठक यांना दिली. पाठक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बराच वेळ झाला असता. त्यामुळे त्यांंनी उपस्टेशन व्यवस्थापक मनीष गौर यांना फोन करून माहिती दिली. गौर आणि राजू डाचा यांनी धावपळ करीत महिलेपर्यंत पोहोचले. तत्पूर्वी रेल्वे डॉक्टर मंगेश यांना बोलाविले. सोबतच रुग्णवाहिकाही आली.
त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने श्वास घेण्यातही त्यांना अडचण येत होती. रेल्वे डॉक्टरांनी तपासताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेने मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी रेल्वे डॉक्टर मंगेश त्यांच्या सोबत गेले. वेळीच उपचार मिळाल्याने धोका टळला. या सहकायार्साठी प्रवासी महिला आणि त्यांच्या परिचिताने रेल्वे कर्मचाºयांचे आभार मानले.