Advertisement
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर, अंबाझरीसह अन्य नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते ११ या वेळेत आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी परिसर, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट, पांढराबोडी, रामनगर, बाजीप्रभू चौक, मुंजेबाबा आश्रम, सुदामनगरी, उज्वल सोसायटी, संजय नगर गिरीपेठ, गोरेपेठ, धरमपेठ, खरे टाउन, भगवाघर ले आऊट, शंकर नगर, धंतोली, छोटी धंतोली येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते १० या वेळेत शासकीय मुद्रणालय, सीटीओ परिसर, झिरो मेल परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील. वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे.
Advertisement