Published On : Sat, Aug 17th, 2019

प्रभाग क्र 16 च्या एकशे अकरा लाभार्थ्यांना स्थायी पट्टे वाटप

Advertisement

नवीन कामठी परिसरातील प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचे नळ लागणार :-पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कामठी :-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 च्या छत्रपती नगर , आययुडीपी एरिया यासारख्या भागातील रहिवासी नागरिकांना घराचा मालकी हक्क मिळावा या मुख्य उद्देशाने काल 16 ऑगस्ट ला पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ऍड सुलेखाताई कुंभारे शुभ हस्ते एकशे अकरा लाभार्थ्यांना स्थायी पट्टे वितरण करण्यात आले.यावेळी नवीन कामठी परिसरातील प्रत्येक घरी पिण्याच्या गोड पाण्याचे नळ लागणार असल्याचे मत पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 16 छत्रपती नगर येथे आयोजित पट्टे वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्थायी पट्टे वाटप कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या माजी मंत्री एड सुलेखाताई कुंभारे ,नगराध्यक्ष शहाजहा शफाअत, उप विभागीय अधिकारी वंदना सौरंगपते , तहसीलदार अरविंद हिंगे ,नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेविका स्नेहलता गजभिये , नीरज लोणारे,लालसिंग यादव ,, सुषमा सीलाम, उज्वल रायबोले, राजेश खंडेलवाल, शोभा वंजारी, ऍड आशिष बंजारी ,चंद्रकांत पडोळे , प्रदीप भोकरे, रुपेश जैस्वाल, ठाणेदार संतोष बकाल , उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले नागरिकांना प्राथमिक सुविधा पिण्याचे पाणी ,रोड ,नाल्या ,विज आरोग्य,ह्या उपलब्ध करून देणे याकरिता मी प्राथमिकतेंनी समस्या सोडवत असून पाणीसमस्या करिता 27 करोड रुपयांचा निधी मंजूर झाला असून नवीन कामठी परिसरातील प्रत्येक घरी गोड पाण्याचे नळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, कामगारांकरिता पंतप्रधान आवास योजना अंतर्गत नागरिकांना स्थाई पट्टे उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना लवकरच घरे बांधण्याकरिता 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे ,सोबतच नवीन कामठी परिसरात पाच हजार घरे म्हाडाच्या वतीने निर्माण करून देण्यात येणार आहेत कामगार वर्गातील नागरिकांनी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत तीस रुपये ची आरोग्य सदस्यांची नोंदणी करून घेतली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल सोबतच पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य साठी लागणारा खर्च शासना कडून करण्यात येणार, अन्नसुरक्षा योजनेनंतर अंतर्गत कामगार नागरिकांनी नोंदणी केली तर त्यांना योग्य भावात सहकारी स्वस्त धान्य दुकानातून अल्प दरात धान्य मिळणार आहेत त्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेण्याचे आव्हान पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी केले संचालन शोभा वंजारी यांनी केले व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement