Published On : Tue, Aug 6th, 2019

नागपूर विमानतळावर तरुणीचा विनयभंग

Advertisement

Representational Pic

नागपूर : मुंबईला निघालेल्या एका तरुणीचा (वय २५) विमानतळावरील हेल्परने विनयभंग केला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गो एअरच्या स्टॅण्ड अलोन मशीनजवळ ही संतापजनक घटना घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सोनेगाव पोलिसांनी आरोपी आलोक राजेंद्रप्रसाद रायकर (वय ३५) याला विनयभंगाच्या आरोपात अटक केली.

पीडित तरुणी मुंबईत एका खासगी कंपनीत प्रॉडक्शन विभागात काम करते. शनिवारी, रविवारची सुटी कुटुंबीयांसोबत घालविल्यानंतर ती सोमवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाली होती. मुंबईला जाण्यासाठी ती सकाळी ८.३० वाजता विमानतळावर आली. येथे तिने आपली बॅग तपासणीसाठी दिली. गोएअर स्टॅण्ड अलोन मशीनजवळ बॅगची तपासणी करताना बॅग उचलण्याच्या बहाण्याने आरोपी आलोकने तरुणीला स्पर्श केला.

त्याचे कलुषित मनसुबे लक्षात आल्याने तरुणीने त्याची कानउघाडणी करून विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय राठोड यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी आलोकला अटक केली. आरोपी आलोक एव्हिएशन कंपनीचा कर्मचारी (लोडर) आहे. या घटनेमुळे तरुणीला आजच्या आपल्या मुंबई प्रवासाला रद्द करावे लागले. विमानतळावर घडलेल्या या घटनेमुळे काही वेळेसाठी वातावरण गरम झाले होते.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जरीपटक्यातही विनयभंग
जरीपटक्यातही आरोपी मोहम्मद खान अहमद खान (रा. कामगारनगर) याने एका महिलेला (वय ३५) दुचाकीवरून खाली पाडून तिचा विनयभंग केला. पीडित महिला आपल्या मुलाला भेटण्यासाठी रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास भावाच्या दुचाकीवर बसून निघाली होती.

सुगतनगर बौद्धविहाराजवळ तिला आरोपी मोहम्मद खानने अश्लील इशारे केले. तिने विरोध केला असता, आरोपीने तिला दुचाकीवरून खाली ढकलून पाडले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपीला आवरले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement