Published On : Sat, Aug 3rd, 2019

ताई गोळवलकर महाविद्यालयात विद्यार्थांनी अनुभवला “पावसाळी रानभाज्या महोत्सव”

Advertisement

रामटेक : महाविद्यालयात “पावसाळी राणभाज्या महोसव “चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते . पावसाळयात,शेतात व जंगलात अनेक वनस्पति उगवतात ,यातील काहिंचा आपन राणभाच्या म्हणून वापर करतो ,या राणभाज्या अरोग्या साठी उपयुक्त असतात.

कारण त्यात मोठ्या प्रमाणतात जीवनसत्व ,खनिज द्रव व शरीराला पौष्टिक आवश्यक औषधी गुणधर्म ही असतात .या साठी या वनस्पतिची ओळख ,त्यांच्या उपयोग व त्यांचे गुणधर्म चा बाबतीत प्राथमिक माहिती असण गरजेच आहे .असा मोलाचा सल्ला प्राचार्य राजेश्री शिंगरू यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला .

ताई गोळवलकर महाविद्यालया मध्ये वनस्पती विभागा तर्फ ,विभागाप्रमुख प्राध्यापिका स्वतन्त्रता शर्मा यांच्या बी एस सी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांनी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे “आयोजन केले होते .

हयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्धाटक महाविद्दालयाचे प्राचार्य राजेश शिंगरू होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व विधार्थी व कर्मचाऱ्यांनी उपस्थीती दर्शवुन सहेयाग दिला.कधी न पाहिलेल्या रानभाज्याची ओळख प्राचार्य राजेश शिंगरू यांनी करवून दीली . विद्यार्थ्याना ह्यावेळी शास्त्रशुद्ध माहिती मिळाली तसेच त्यांचा आस्वाद सुधा घेता आला. हा अनुभव विद्यार्थांकरीता अविस्मरणीय ठरला .