Advertisement
File Pic
नागपूरमधील अंबाझरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्टयाची मुदत 99 वर्षे करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपुरातील अंबाझरी तलाव व उद्यान परिसराचा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याद्वारे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.
यासाठी महामंडळास अंबाझरी तलाव परिसरातील 44 एकर जागा वार्षिक 1 रुपये भुईभाडे दराने 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. या भाडेपट्ट्याचा कालावधी सुधारित करुन त्याची मुदत 99 वर्षे इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Advertisement