Published On : Mon, Jul 22nd, 2019

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी बघितला ‘सुपर ३०’

महापौर नंदा जिचकार यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

नागपूर : विपरीत परिस्थितीतील ३० मुलांचे शैक्षणिक आव्हान स्वीकारून त्यांना उच्चपदावर नेण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शिक्षकांची प्रेरणाकथा असलेला हृतिक रोशन अभिनित ‘सुपर ३०’ हा चित्रपट सदरमधील बुटी सिनेप्लेक्स मध्ये ३०० विद्यार्थ्यांनी बघितला आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही, असा संदेश घेत चित्रपटगृहाच्या बाहेर पडले.

Gold Rate
03 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,100 /-
Gold 22 KT ₹ 1,12,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सनजेंटस्‌ आणि मॉम्‌स प्रॉडक्शनच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुटी सिनेप्लेक्स येथे दुपारी १२ वाजता हा चित्रपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, नगरसेविका परिणिता फुके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, शिक्षण विभागाचे विनय बगले, आर.जे. सौरभ, मॉमस्‌ प्रॉडक्सशनचे सनी फ्रान्सीस, यश दस्तुर, अरविंदर कौर, कौशिक जोशी, संध्या पवार, प्रतिभा दिवाटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, या देशात झालेले सर्व महापुरुष हे त्यांच्या बालपणी सामान्यच होते. मात्र विपरीत परिस्थितीतही कुशाग्र बुद्धीमत्ता आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी आपले महानपण सिद्ध केले. कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आपण आपल्यात जिद्द बाळगली आणि त्या दिशेने मेहनत केली तर सारे काही शक्य आहे, असा मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर म्हणाल्या, ‘सुपर ३०’ हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा चित्रपट आहे. असा चित्रपट बघून विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी. केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे न बघता काही तरी त्यातून शिकावे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. मात्र, अशा परिस्थितीतूनही जिद्दीच्या जोरावर अनेक विद्यार्थी घडले आहेत. आपणही तसा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सनी फ्रान्सीस यांनी केले. यावेळी मनपाच्या विविध शाळांतील सुमारे ३३० विद्यार्थ्यांनी चित्रपट बघितला. त्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement