Published On : Sat, Jul 13th, 2019

हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी मनपा प्रशासन सज्ज

Advertisement

नगरसेवक दयाशंकर तिवारी व अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घेतला आढावा

नागपूर : मुस्लीम बांधवांच्या श्रद्धास्थान असलेल्या हज यात्रेला जाणा-या भाविकांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज असून यात्रेकरूंना कुठलाही त्रास जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हज यात्रेला जाणा-या मुस्लीम बांधवांच्या सुविधांसंदर्भात शनिवारी (ता.१३) सेंट्रल एव्‍हेन्यू मार्गावरील हज हाउस येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त व हज यात्रेकरू सुविधांसाठी नेमण्यात आलेले नोडल अधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस.मानकर, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नागपूर जिल्हा हज कमेटीचे अध्यक्ष जुनैद खान, सचिव शेख बारी पटेल, सदस्य मो. गयासुद्दीन, हाफीज अख्तर अशरफी, सैय्यद अशफाक, तैय्यब रिजवी, सैय्यद शहनाज अली, हाजी रहिम, मौलाना इरशाद, नजमा बेगम, फैयाज अहमद यांच्यासह मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हज यात्रेला जाण्यासाठी विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येत नागपुरात येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था हज हाऊस येथे करण्यात येते. यावर्षी सुमारे तीन हजार मुस्लीम बांधव नागपुरातून हज यात्रेला जाणार आहेत. त्यांच्या यात्रेदरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हज हाऊस येथे निवास करीत असताना त्यांना लागणा-या सर्व सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिले.

ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही यावेळी काही सूचना केल्या. हज हाउस परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था, परिसरात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, योग्य विद्युत व्यवस्था, आरोग्य विभागाची वैद्यकीय चमू, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन विभागाची चमू यासह सर्व विभागाच्या अधिका-यांनी प्राधान्याने सर्व सुविधांची व्यवस्था करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. बैठकीनंतर सर्व मान्यवरांनी हज हाऊस परिसराचा दौरा करीत आढावा घेतला.

Advertisement
Advertisement