Advertisement
कन्हान: नगरपरिषद कन्हान – पिपरी येथे भाजपा कन्हान शहर च्या वतीने स्वामी विवेकानंदाना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
भाजपा कन्हान शहर व्दारे नगरपरिषद कन्हान – पिपरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास डॉ. मनोहर पाठक उपाध्यक्ष न प कन्हान यांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमोल साकोरे भाजपा कन्हान शहर महामंत्री हयानी आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, नगरसेवक मनोज कुरडकर, राजेंद्र शेंदरे ,अनु,: सुचित जाती मोर्चा अध्यक्ष हर्ष पाटील, तालुका प्रसिद्धि प्रमुख शैलेश शेळकी, कामेश्वर शर्मा, मयुर माटे, संदीप कभे, के जी रघुवंशी, हरीओम नारायण, राहुल कोल्हे सह भाजपा कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.