Published On : Thu, Jun 6th, 2019

एमआयडीसीतील मटका अड्ड्यावर छापा : २२ जुगारी पकडले

Advertisement

 


नागपूर: गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी एमआयडीसीतील एका मटका अड्ड्यावर छापा घालून मटका चालविणारा आणि खेळणाऱ्या एकूण २२ जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि मटकापट्टी जप्त करण्यात आली.

एमआयडीसीतील झोन चौकात गेल्या अनेक वर्षांपासून अफसर खान नामक गुन्हेगार मटक्याचा अड्डा चालवतो. त्याच्या अड्ड्यावर दिवसभर मटका लावणारांची वर्दळ असते. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी कल्याण मटका खेळणाऱ्या २२ जणांना पकडण्यात आले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रमेश लक्ष्मणराव काळबांडे, मनोहर प्रभाकर खंडारे, मनोज जानराव कुंभारे, शैलेश बाबुराव मेश्राम, हरीदास आत्माराम मेश्राम, अनिल विष्णुदास यादव, रामआशिष बैजनाथ पासवान, कैलास मनोहर ठाकरे, राहुल मुलचंद काठार, सतीश राजेश सिंग, प्रकाश गजानन मस्के, विनोद रामकुमार पंडित, प्रभाकर सीताराम बेलेकर, किशोर शामराव शेंडे, अमृत अंबादास कुमरे, बब्बू जनिरामराव चौरागडे, सुभाष बबन सोनकुसरे, सुरेश मनोहर पानुरकर, स्वप्निल वामन परबत, मनोहर मोतीरामजी पांडे, वासुदेव श्रीपाद हिवाळे आणि ज्ञानेश्वर सोमाजी ठाकरे अशी मटका खेळताना पकडल्या गेलेल्यांची नावे आहेत. या २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख आणि मटक्याच्या साहित्यासह ६२,३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उपरोक्त आरोपींविरुद्ध एमआयडीसी ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट एकचे पथक प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Advertisement
Advertisement
Advertisement