नागपूर :- नागपूरच्या तात्या टोपे नगर येथे कुजलेल्या अवस्थेत 2 वृद्ध व्यक्तींचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.मोहन रंझुमलओटवाणी वय अंदाजे ७५ ते ८० वर्ष असे वृद्ध पुरुषाचे तर शांता रंझुमल ओटवाणी असे मृत महिलेचे नाव आहे.दोघेही मृत बहीण – भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वृद्धापकाळाने दोघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे… बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तात्या टोपे नगर परिसरात जुनं बांधकाम असलेल्या घरात दोघेही वृद्ध राहत होते.
मृत मोहन ओटवाणी रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघेही मृत बहीण-भाऊ घरातच राहायचे, घराबाहेर क्वचितच पडायचे तसेच घराला आतून कायम कुलूप लावलेलं असायचं.घरात त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता त्यामुळे त्यांच्याकडे कधीकाळी 5-6 कुत्रे असायचे.
मोहनलाल यांचा म्रुत देह फारच कुजलेल्या अवस्थेत आतील खोलीत पडून होता तर शांता यांचा म्रुत देह कमी कुजलेला व घरात प्रवेश करणाऱ्या गेट जवळील जिन्या जवळ फडून होता. मृतांना मुलं – बाळ नव्हते किंवा नातेवाईक देखील संपर्कात नव्हते… पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे प्रकरणाची नोंद केली आहे.