Published On : Tue, Jan 8th, 2019

पंकजा मुंडे या दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही- नवाब मलिक

Advertisement

धनगर आरक्षणावर घुमजाव करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार.

Nawab Malik

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

Gold Rate
Apr 132026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,40,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे या दोन दिवसापूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही अशा सांगत होत्या आणि आता त्यांनी घुमजाव केले आहे. आज त्या मंत्रालयात आल्या त्यावेळी लोकांनी विचारले असता मी २०१९ला सत्ता मिळणार नाही असे म्हणाल्या असे स्पष्ट केले. म्हणजे याचा अर्थ या दोन दिवसपण सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही. ही परिस्थिती आज आहे. यांचा हा खेळ सत्तेसाठीच आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यात जेव्हा कधी निवडणूका होतील त्यावेळी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपाला धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement