Published On : Thu, Dec 20th, 2018

‘स्वच्छता मित्र’ व्हा…शहर स्वच्छतेचे भागीदार बना!

महापौरांचे आवाहन : तेजस्विनी महिला मंचच्या सदस्यांना दिले ओळखपत्र

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नागपूर शहर सहभागी झाले आहे. या मोहिमेत लोकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे आणि स्वच्छतेचा जागर करावा, या हेतूने नागपूर महानगरपालिकेने ‘स्वच्छता मित्र’ बनण्याचे आवाहन केले आहे. या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे आणि स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा भाग बनावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याच आवाहनाला प्रतिसाद देत नागपुरातील तेजस्विनी महिला मंचच्या सदस्यांनी ‘स्वच्छता मित्र’ बनण्यात पुढाकार घेतला. याच महिला मंचच्या श्रीमती किरण मुंदडा आणि श्रीमती कल्पना मोहता यांनी पहिले ‘स्वच्छता मित्र’ होण्याचा मान पटकाविला. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दोन्ही स्वच्छता मित्रांना ओळखपत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती किरण मुंदडा म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेसोबत स्वच्छता अभियानांतर्गत जनजागृतीचे कार्य करणे हा आमचा बहुमान आहे. मनपाच्या स्वच्छताविषयक कुठल्याही मोहिमेत आमचा सहभाग राहील. हे माझे शहर आहे, ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाली तर अशा मोहिम राबविण्याची गरजच पडणार नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन स्वच्छता मित्र किरण मुंदडा यांनी केले.

महापौर नंदा जिचकार यांनी दोन्ही ‘स्वच्छता मित्र’चे अभिनंदन केले. तेजस्विनी महिला मंचच्या सदस्यांसारखे नागपूर शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी समोर यावे, असे आवाहन केले,

Advertisement
Advertisement