कन्हान : – पचायत समिती पारशिवनी अंतर्गत कन्हान केंद्रातील जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे जागतिक विकलांग (अपंग) दिवस साजरा करण्यात आला .
जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे श्री गोविंदरावजी येवले अध्यक्ष भाजपा अपंग सेल पारशिवनी तालुका यांच्या अध्यक्षेत गावातील प्रेमदास येळणे, पाडुरंग हटवार (अंध) व इतर अपंगासह सौ यशोदा महादेव वैद्य मुकबधीर आणि महादेव वैद्य यांचा सहपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . सर्व अपंगांना सन्मानाने शाळेत आणण्याचे काम सिकंदर येवले व रामसिंग भोले हयानी केले . शाळेचे मुख्याध्यापक शांताराम जळते यांनी आपल्या प्रास्तविकातुन अपंगाच्या गौरव गाथा सांगितल्या तसेच सर्व शिक्षा अभियान व समाज कल्याण विभाग यांच्या योजनाची माहीती सागितली .
सौ अनिता दुबळे यांनी अपंग, विकलांग, मतीमंद, यांच्या मतदाना विषयी मार्गदर्शन केले . अध्यक्षीय मार्गदर्शनात गोविंदराव येवले यांनी अपंग सघटनाचे कार्य समजावून सागितले व मार्गदर्शनाने सर्व अपंगामध्ये नवी चेतना निर्माण केली .
कार्यक्रमास उपस्थितीत सर्व मान्यवरांचे आभार श्री टिकाराम कडुकर सर यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री बाबा बंड, सौ कल्पना येळणे , कु सुनंदा कुंभलकर, आचल वैद्य, प्रणाली भोले प्रशिक अनकर, कोमल डंढारे , कुणाल पोटभरे , शर्वरी तुरणकर आदीने सहकार्य केले .