Published On : Thu, Nov 1st, 2018

बंद पथदिव्यांच्या मार्गातील अडचणी दिवाळीपूर्वी दूर करा : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : नागपूर शहराच्या बहुतांश प्रभागातील अनेक पथदिवे बंद आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत काही बाबी अडकल्या असल्या तरी त्यावर मध्यमार्ग काढा. दिवाळीपूर्वी बंद असलेले पथदिवे सुरू करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या नेहरूनगर झोन, हनुमाननगर झोन आणि धंतोली झोनमधील बहुतांश प्रभागातील अनेक पथदिवे बंद असलेल्या नागरिकांच्या तक्रारींवरून आमदार सुधाकर कोहळे यांनी महापौर नंदा जिचकार यांना निवेदन दिले होते. याच निवेदनाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात संबंधित झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत त्या बोलत होत्या.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, अपर आयुक्त अझीझ शेख, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, सहायक आयुक्त स्मिता काळे, राजू भिवगडे, नगरसेवक अभय गोटेकर, राजेंद्र सोनकुसरे, नरेश मानकर, भगवान मेंढे, नगरसेविका माधुरी ठाकरे, विद्या मडावी, मंगला खेकरे, स्नेहल बिहारे, वंदना भगत, मनिषा कोठे, समिता चकोले, कल्पना कुंभलकर, वंदना भुरे, भारती बुंडे, स्वाती आखतकर, लता हाथीबेड, मंगला गवरे उपस्थित होत्या.

सदर बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी पथदिवे बंद असल्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. दररोज नागरिक यासंदर्भात तक्रारी करतात. मात्र, विद्युत विभागाकडून यासंदर्भात समाधानकारक उत्तर मिळत नाही. यासंदर्भात बोलताना कार्यकारी अभियंता संजीव जयस्वाल यांनी हा प्रश्न निर्माण होण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. परंतु यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बसून तातडीने तोडगा काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यासंदर्भात बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी पथदिवे बंद असल्याच्या मार्गातील सर्व अडचणींवर तातडीने तोडगा काढून दिवाळीपूर्वी बंद असलेले पथदिवे सुरू करा, असे निर्देश दिले. बैठकीला संबंधित झोनमधील उपअभियंता उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement