Published On : Sat, Sep 15th, 2018

मुंबईतीलकमला मिल मध्ये लागलेल्या आगीला मिल चे मालकच जबाबदार ; आयोग

Advertisement

मुंबई : कमला मिल मध्ये लागलेल्या आगी प्रकरणी डिसेंबर २०१७ मुंबई उच्च न्यायालाने नियुक्त केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने या कारखान्याचे मालक आणि दोन रेस्टॉरंट मालकांनी ही घटना घडवून आणल्याचा धाकादायक खुलासा केला आहे.

२९ डिसेंबर २०१७ रोजी समितीने दिलेल्या अहवालात सांगितले की रेस्टोरंट मध्ये चालविल्या जात असलेल्या अवैध्य हुक्का पार्लरमुळेच कमला मिल आगीच्या विळख्यात सापडली.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केरळ उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अरविंद व्ही सावंत यांच्या नेतृत्वाखालील समितीने २००९ च्या अहवालानुसार उच्च न्यायालयाला अहवाल सादर केला आहे.

मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंटच्या दक्षिणेकडील भागात अवैध्य रित्या हुक्का पार्लर चालविला जात होता तसेच, या रेस्टॉरंटच्या टेरेसवर तंदुरी भट्ट्या होत्या. न्यायालयाने दिलेल्या अहवालानुसार या आगीला हे सर्व जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या इमारतीत आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच आग लागण्यासारखी घटना घडल्यास कुठलीही उपाय योजना नसल्याचे ही समोर आले आहे.

समितीच्या मते रमेश गोवानी यांनी २० % पेक्षा जास्त एफएसआयचा अवैध्य रित्या वापर करून डीसीआर-५८ (डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन) कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement