Advertisement
मुंबई :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासह अन्य मागण्यांकरिता समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी धनगर समाजाच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे व त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीस जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे तसेच शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते.