बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मधील आरोपींनी आज दिनांक 7/8/2018 रोजी न्यायालयात चार्ज फ्रेमिंग टाळण्याकरिता लावलेला अर्ज माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9) यांनी फेटाळला जेल बंद असलेले सर्व आरोपी बंदोबस्तात न्यायालयात पोलिसांद्वारे हजर करण्यात आले.
आरोपींच्या वकिलांनी आज दुसऱ्यांना न्यायालयात चार्ज फ्रेमिंग टाळण्याकरिता अर्ज दाखल केला व त्यात असे नमूद केले की या प्रकरणाची पुढील सुनावणी देशातील दुसऱ्या राज्यात व्हावी याकरिता आरोपींच्या वतीने माननीय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची आहे आणि त्याकरिता वेळ मागण्यात आला.
दिनांक 24/7/2018 रोजी याच प्रकारचा अर्थ यात माननीय न्यायालय राजकीय दबाव असल्याचे कारण नमूद करून आरोपींच्या वकिलाने वेळ मागितला होता, आरोपींना उपरोक्त संधी मिळावी म्हणून दिनांक 24/7/2018 रोजी माननीय न्यायालयाद्वारे 15 दिवसाचा वेळ देण्यात आला होता, वारंवार वेळ मागणारे अर्ज आरोपींच्या वतीने आरोपीचे वकील दाखल करून त्या अनुसंगाने कोणतेही दस्तावेज जसे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका किंवा याचीकेचा केस नंबर आरोपीने अर्जात नमूद केलेला नाही व तसेच चार्ज फ्रेमिंग हा प्रक्रियेतील पहिला टप्पा असून पुढे केस सुरू होण्या करिता भरपूर वेळ असल्याकारणाने माननीय न्यायाधीश श्री.ए. एस.काझी साहेब यांनी आरोपींनी लावलेला अर्ज फेटाळून लावला.
आरोपीच्या वतीने adv देवेंद्र चव्हाण यांचे सहकारी adv गौर यांनी बाजू मांडली व तसेच सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे (DGP)साहेब यांनी अर्ज़ाचा विरोध करत असा युक्तिवाद केला की जाणीवपूर्वक आरोपी केस पुढे चालविण्यात विलंब करीत आहे.
या वेळेस माननीय न्यायाधीशांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आदेशात असे नमूद केले की प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती सरकारने केलेली आहे सर्व बाबी लक्षात घेता माननीय न्यायालयाने आरोपीचा अर्ज रद्द करून चार्ज वर युक्तिवाद तसेच चार्ज फ्रेमिंग करिता पुढील तारीख दिनांक 13 /8/2018 रोजी ठेवण्यात आलेली आहे.फिर्यादी तर्फे एडवोकेट समीर सोनवणे यांनी सुद्धा बाजू मांडली.