Published On : Wed, Aug 1st, 2018

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाचा विकास आराखडा सादर

मुंबई : अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. त्यास पुढच्या आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन महाविद्यालयाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहात आज यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यास वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आदी उपस्थित होते.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चंद्रपूर येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न 500 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. 30 जुलै 2019 पर्यंत या रुग्णालयाचा पहिला टप्पा कार्यान्वित व्हावा या दृष्टीने रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. मागास जिल्हे आहेत. गडचिरोली जिल्हा प्रधानमंत्री यांनी घोषित केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

या रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती म्हणून केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित एच एस सी सी इंडिया लि. ची निवड करण्यात आली असून या कंपनीशी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सामंजस्य करार केला आहे.

रुग्णालयाचे आणि महाविद्यालयाचे काम करताना अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान उपयोगात आणावे, महिला वसतिगृहांची संख्या वाढवावी, वन विभागाचे सहकार्य घेऊन रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या परिसरात वनौषधींची लागवड करावी, अशा सूचनाही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

Advertisement
Advertisement