Published On : Sun, Jul 29th, 2018

व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि लकी म्यूझिकल इवेंट्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्हाइस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून २३ स्पर्धकांची निवड आज करण्यात आली. ४ ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात विजेत्याची निवड करण्यात येईल.

विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित सेमीफाइनलसाठी प्राथमिक फेरीतून निवड करण्यात आलेल्या १२७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आजच्या स्पर्धेत १४ वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४ वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३ स्पर्धकांची निवड करण्यात आली. मनपाचे क्रीड़ा सभापती नागेश सहारे, हर्षल हिवरखेड़कर, समीर सराफ, डॉ. रिचा जैन यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. परीक्षक म्हणून पद्माकर तंत्रपाळे, योगेश ठक्कर, राजेश भुरभुरे, प्रवीण लिहितकर, अंकिता टकले, विजय चिवंडे यांनी काम बघितले. लकी खान यांनी आभार मानले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विजयी स्पर्धक :
१४ वर्षावरील गट : प्राची वैद्य, स्वास्तिका ठाकूर, उजमा शेख, श्रीकांत टकले, वैष्णवी निम्बुलकर, गौरव हजारे, पौर्णिमा, श्रेया मेंढे, विजय खडसे, प्रज्योत देशमुख, स्नेहल चव्हाण, शशांक मोरेकर, जगदीश डोंगरे.

१४ वर्षाखालील गट : ज्ञाननंदा भोंडे, सुमिधा बालपांडे, आयुष मानकर, सिया जेम्स, स्वप्नमय चौधरी, मिताली कोहड़, विश पारलकर, सानवी पाठक, श्रावणी खंडाले, मुकुंद कुथे.

४ ऑगस्टला ‘फाय्नल’
‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची अंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेसाठी श्रोत्याना प्रवेश निःशुल्क राहील

Advertisement
Advertisement
Advertisement