Published On : Mon, Jul 16th, 2018

मरियम अम्मा दरगाह सालाना उर्स शरीफ थाटात संपन्न.

कन्हान : – हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट (जुनीकामठी) येथे तीन दिवसीय ९६ वा सालाना उर्स शरीफ चे आयोजन करून थाटात साजरा करण्यात आला.

हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट (जुनीकामठी) येथे तीन दिवसीय ९६ वा सालाना उर्स शरीफ चे बुधवार दि. ११जुलै २०१८ ला नमाजे ईशा मिलाद शरीफ ने सुरूवात करण्यात आली. मध्यरात्री च्या नंतर मजारे पाक. गुरूवार दि.१२ जुलै दुपारी १२. ३० वाजता हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट येथुन दरबारी शाही संदल काढुन पिपरी मार्ग आंबेडकर चौकातुन रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोहचला.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच बाबा ताजुद्दीन मोठा ताजबाद नागपुर येथुन शाही संदल निघुन कामठी च्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह येथे चादर चढवुन कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचुन दोन्ही शाही संदल एकत्र कन्हान शहराचे भ्रमण करून तारसा रोडनी गहुहिवरा रोड आदीवासी गोवारी चौक, शहिद चौक, तारसा रोड चौक, आंबेडकर चौकाकुन पिपरी मार्गे गाडेघाट पोहचुन शाही संदलचे समापन करण्यात आले.

तंदनंतर सायंकाळी ६. वाजता झेंडा वदन करून शाही चादर चढविण्यात आली . रात्री १० वाजता मिलाद शरीफ महफिले कव्वाली कार्यक्रमाचा भाविकांनी आंनद लुटला. शुक्रवार दि. १३जुलै ला सकाळी ९ वाजता महाप्रसाद वितरण करून सालाना उर्स शरीफ चे समापन करण्यात आले.

शाही संदल कन्हान शहरात पहिल्यांदाच काढण्यात आला असुन यात घोड़े , बैंड , मटका बैंड सहित विविध आकर्षण अत्यंत मोहित करणारे असुन हा अनुभव प्रथमत: भाविकांनी मिळाला . या सालाना उर्स शरीफ मध्ये मोठय़ा संख्येने भाविक सहभागी होऊन कार्यक्रमाचा ला़भ घेतला . सालाना उर्स शरीफ च्या यशस्वीते करिता मरियम अम्मा दरगाह गाडेघाट कमेटी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .

Advertisement
Advertisement