Published On : Wed, May 30th, 2018

करिना कपूर पुन्हा आई होणार!

Advertisement

Kareena Kapoor
मुंबई: मोठ्या कालावधीनंतर ‘वीरे दे वेडिंग’ या सिनेमातून कमबॅक करणा-या करिना कपूरने बॉलिवूडमध्येकेले आहे. तैमुरच्या जन्माआधीपासूनच तिने सिनेमात काम करणे कमी केले होते. तैमुरची आई म्हणून बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात ओळखली जाणारी करिना आता पुन्हा एकदा आई होणार आहे. पण रियल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. आगामी चित्रपटात करिना लवकरच आईची भूमिका करणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

तैमूरच्या जन्मानंतर त्याने तातडीने या भूमिकेसाठी करिनाला विचारणा केली होती. मात्र त्यावेळी तैमुरच्या संगोपणाचे कारण देत करिनाने ही भूमिका नाकारली होती. करणला या भूमिकेसाठी करिनाच हवी होती. या चित्रपटाची कथा लग्न आणि नातेसंबंधावर आधारित आहे, अशी माहिती मिळत आहे.

या चित्रपटाचे नाव तसेच त्यामधील मुख्य कलाकारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र येत्या नोव्हेंबरच्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांचे साह्यय्यक राज मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement
Advertisement