Published On : Wed, May 16th, 2018

पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले

Gappi Fishes, Dengue Day

नागपूर: राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

दहाही झोनअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रेखा साकोरे, वनिता दांडेकर, रूपा राय, शीतल कामडे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, झिशान मुमताज अंसारी, आशा ऊईके, सैय्यदा बेगम, कांता रारोकर, भावना संतोष लोणारे, मंगला योगेश लांजेवार, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, सतीश होले, संजय चावरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजू वराटे, विजय काळे सहभागी झाले होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रभातफेरीच्या प्रारंभी उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. प्रभातफेरीचे आयोजन लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रुग्णालयातून, धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथून, हनुमान नगर झोनमध्ये झोन कार्यालयातून, धंतोली झोनमध्ये पार्वतीनगर येथून, नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा येथून, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग येथून, लकडगंज झोनमध्ये वर्धमाननगर येथून, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर येथून तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथून प्रभातफेरी करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गप्पीमासे वाटप कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक झोनमध्ये करण्यात आले होते.

पाच हजारांवर मासे वाटप
प्रभातफेरीदरम्यान सर्व झोनमधून एकूण ३१०० घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत कुलरमध्ये ३८३०, निरुपयोगी विहिरींमध्ये २७, टाक्यांमध्ये ८१९, मातीच्या भांड्यांमध्ये १५५, कारंज्यांमध्ये सात, मोठ्या नाल्यांमध्ये सात, लहान नाल्यांमध्ये नऊ, तळघरांमध्ये पाच, रिकाम्या भूखंडांवर तीन, बांधकामाच्या स्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यांमध्ये तीन, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्ड्यांमध्ये १२ आणि अन्य ठिकाणी २०७ असे एकंदर पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

Advertisement
Advertisement