Published On : Mon, May 14th, 2018

ठाण्यात पाकिस्तानातून आणलेल्या साखरेच्या गोण्या फोडल्या

Pakistani Sugar Godown
ठाणे : पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडण्यात आलं आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हे गोदाम फो़डलं आहे. दहिसरमोरी गावात-डायघर परिसरातील गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड ही साखरेची गोण्या फोडताना दिसत आहेत.

भारत सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे, त्या साखरेचं गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. देशात पुरेशी साखर असताना पाकिस्तानकडून ही साखर आयात करण्यात आली आहे, असा आरोप आहे. साखरेच्या बाबतीत राज्यातही स्थिती चांगली नाहीय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य तो भाव मिळत नाहीय. तर दुसरीकडे पाकिस्तानातून साखर आयात करण्याची वेळ सरकारवर आली आहे.

देशात तयार केलेल्या साखरेला भाव मिळत नसताना, पाकिस्तानातून साखर का आयात केली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे, तर हे गोडाऊन कुणाचं आहे, मालक कोण आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही, तसेच ही साखर येथे का ठेवण्यात आलेली आहे हे स्पष्ट होणार नाहीय. नवी मुंबईत देखील पाकिस्तानची साखर आयात करण्यात आली आहे. देशी साखरेपेक्षा या साखरेचा भाव १ रूपयापेक्षा कमी आहे. देशातील साखर पुरेशी असताना अशी साखर बाहेरून आयात केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement