नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी कडून ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संविधान चौकात डॉ. देवेंद्र वानखडे, आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी संविधांचे रक्षण करण्याचा संकल्प घेतला. सोबतच डॉ बाबासाहेबांचा जयजयकार करीत घोषणा दिल्यात.
त्यानंतर दक्षिण पश्चिम टीम कडून इमामवाडा आणि माटे चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर पूर्व नागपूरच्या वाठोडा येथे रामकुमार गुप्ता यांच्या सौजन्याने घर सोसायटी नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध वंदना करण्यात आली. तसेच बुद्धविहारात दर्शन घेवून बुंदी वितरणचे कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी डॉ देवेंद्र वानखडे यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून भारताचे संविधानाबद्दल माहिती दिली. कु. अक्षया गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानले. यावेळी स्थानिक वस्तीमधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी जगजीत सिंग, अशोक मिश्रा, प्रशांत निलाटकर, प्रमोद नाईक, उमाकांत बनसोड, अंबरीश सावरकर, गीता कुहीकर, शालिनी अरोरा, डॉ. अशोक लांजेवार, निलेश गोयल, जितेन्द्र मुट्कुरे, राजेश शेवळे, संतोष वैद्य, शरद आकरे, संजय सिंह, दुर्गेश खरे, अविराज थूल, देवेंद्र परिहार, श्री रायपुरे, शिरीष तिडके, सुरेश खर्चे, विनोद अल्म्डोहाकार, मनोज पोतदार, डॉ. कमलाकर अस्कार, प्रा. नितीन चोपडे, चमन बोन्बले इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













