Published On : Thu, Apr 12th, 2018

नागपुरात भरधाव एसटी बसने तरुणाला चिरडले

Advertisement

नागपूर : यानंतर नागरिकांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक नागरिकांनुसार बस क्रमांक एमएच/४०/वाय/५६२५ नागपूरला येत होती. बस चालक कदाचित बस घेऊन वर्धमाननगर डेपोकडे जात असावा. बस अतिशय भरधाव होती. दरम्यान एका नवीन दुचाकीवर युवक नंदनवनकडे जात होता. त्याचवेळी मागून येत असलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात गंभीर जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत होते.

Advertisement
Advertisement