Published On : Mon, Apr 2nd, 2018

अॅ्ट्रासिटी निर्णयाविरोधात वाडीत बंदला संमिश्र प्रतिसाद

Advertisement

वाडी (अंबाझरी) : भारतीय संविधानाने देशातील दलित आदिवासी,उच-निच जातीय व्यवस्था लक्षात घेऊन,सुरक्षेच्या दृष्टीने अनुसुचित जाती,जनजाती कायदा निर्माण केला याच अॅट्रासिटी कायद्याचे नुकतेच सुप्रिम कोर्टाने एका निर्णयाअंती महत्त्व कमी झाल्याचे सिद्ध होण्याची स्थिती निर्माण होताच देशभरातील दलित आदिवासी समाजात असुरक्षतेची भावना व आक्रोश निर्माण झाला.२ एप्रिलला सोशल मिडीयाच्या माध्यमातून भारत बंदचे आव्हाण करण्यात आले होते, याच बंदच्या आव्हानाचा असर वाडी दत्तवाडी परिसरात संमिश्र रूपात दिसून आला.

मोठ्या संख्येने बहुजन युवक एससी,एसटी कायद्याच्या समर्थनात रस्त्यावर आले.भाजपा सरकार विरोधात जबर नारेबाजी केली. मोर्चात विविध संघटने च्या लोकांनी सहभाग घेतला, बहुजन समाज पार्टी, अस्मिता मंच, बहुजन विचार मंच,भिम आर्मी, शौर्य सेना, भिम सेने च्या कार्यकर्त्यानी बंद करण्यात योगदान दिले. बसपा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रणय मेश्राम, बसपा वाड़ी शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के,नगरसेवक नरेंद्र मेंढे, आशीष नंदागवली,प्रमोद भोवरे सह रूपेश थोरात, विजय इंगळे,राष्ट्रपाल वाघमारे, शैलेश अंबादे, शंकर पाटिल, गोपी मेश्राम, किशोर इंगळे, प्रवीण मेश्राम, आनंद श्रीरामे, कुंदन कापसे,प्रणय तभाने, प्रशांत परिपावर, प्रणीत भोवते, बबलू मेश्राम, निखिल सुखदेवे, रोशन मेश्राम, रोशन सोमकुंवर,भूषण सोमकुले, सुधाकर मेश्राम, इ. नी वाड़ी बंद करण्यात सहभाग घेतला.

मोठ्या संख्येत एकत्रीत होऊन निषेध मोर्चा चे आयोजन केले.केंद्र सरकार, मोदी सरकार,ची कार्यप्रणाली,सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करून आक्रोश व्यक्त करण्यात आला.बंदचे आव्हाण लक्षात घेता वाडी दत्तवाडी परिसरात संमिश्न प्रतिसाद दिसून आला.वाडी पोलीसांनी तगडा बंदोबंस्त ठेवला होता, परिसरात कोणतीही अनुचित घटना घडल्याचे दिसून आले नाही.