Advertisement
नागपूर: बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंती प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिक मुख्यालयात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती श्री. संदीप जाधव यांनी नगरी तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक श्री. जितेंद्र घोडेस्वार, नगरसेवक श्री. अजय बूर्रेवार, सुनिल हिरणवार, सहा. आयुक्त श्री. गणेश राठोड, आरोग्य झोनल अधिकारी श्री. रोहिदास राठोड, कनिष्ठ अभियंता श्री.विजय राठोड, राजू चांदेकर, गजानन जाधव, अनिल चव्हाण, श्रीराम जाधव, किशोर वानखेडे, अविनाश जाधव, राजकुमार वंजारी, अनिल राठोड आदी अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.