Published On : Sat, Jan 27th, 2018

भाजपने नागपूर मनपाच्या 112 नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतल्याने खळबळ

Advertisement

NMC-Nagpur
नागपूर : पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल, असे कठलेही कृत्य नगरसेवकाने केल्यास त्यांच्यावर कारवाई करता यावी म्हणून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात नागपूर महानगर पालिकेतील सर्व म्हणजे 112 नगरसेवकांचे राजीनामे लेखी मागून घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरुन यश मिळाले, पण वर्षभरातच भाजपने आपल्या नगरसेवकांचे राजीनामे पक्षाकडे घेतले. नगरसेवकांचे राजीनामे घेतल्यानंतर सुरक्षित सत्तापक्ष नेत्याकडे ठेवण्यात येतात. यामुळे पार्टीची विचारधारा तोडली किंवा पार्टीविरोधी कार्य केल्यास, त्या नगरसेवकावर कारवाई करणे सोपे जात असल्याचे भाजप नेते सांगतात.

पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल असे कृत्य कुठल्या नगरसेवकाने केल्यास त्याच्यावर कारवाई करता यावी या उद्देशाने नागपुर महापालिकेतील भाजपच्या सर्व 112 नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले आहे, असे भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सांगितले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपची पक्षशिस्त टिकवण्यासाठी नगरसेवकांचे राजीनामे घेण्याची नागपुरातील भाजपची 30 वर्षाची परंपरा असल्याचेही यावेळी भाजपकडून सांगण्यात आले आहे. यावेळी काही कारणास्तव विलंब झाला असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. भाजपने सांगितल्यानंतर शिवसेनेा आमदार खासदारांचेही राजीनामे गेतले जातात का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. अनुशासन प्रिय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्येच नगरसेवकांचे राजीनामे घेतल्यामुळे नाराजी आहे. भाजपचा आपल्याचं नगरसेवकांवर विश्वास नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement