Published On : Tue, Nov 21st, 2017

राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा – नंदा जिचकार

Advertisement

नागपूर: राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शहराचा संदेश देण्यात येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेविका कृतिका मेश्राम, असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मोबिलिटीसाठी सायकल एक महत्वाचे साधन आहे. सायकल स्पर्धेमुळे पर्यावरणपूरक शहराचा एक संदेश दिला गेला. अश्याच प्रकारच्या सायकल स्पर्धेचे आयोजन शाळास्तर, महाविद्यालयस्तरावर करण्यात यावे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकाचे त्यांनी स्वागत केले व विजयी स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. अश्या प्रकारच्या स्पर्धेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

नागपूर ते कोंढाळी – नागपूर अशी जलद सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रथम पारितोषिक सांगलीचा दिलीप माने, दुसरे पारितोषिक सांगलीचा करण शिवाजी बंडकर, तिसरे पारितोषिक विठ्ठल भोसले (पुणे), चवथे पारितोषिक शुभम् दास (नागपूर), पाचवे पारितोषिक ए.राजकुमार (औरंगाबाद) यांनी प्राप्त केले.

उत्तेजनार्थ बक्षिस – प्रकाश ओलेकर, हर्षल शेंडे, स्वप्नील लाड, प्रवरा राकेश भैया, जाधव उत्कर्ष आत्राम यांना देण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कुलदीप लोहे यांनी केले तर आभार शंतनू मेश्राम यांनी मानले.
ततपुर्वी सकाळी ६.३० वाजता संविधान चौकात जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवड़े यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी मनपाचे क्रीड़ा सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक मनोज सांगोळे उपस्थित होते. राज्यभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश जांगडे, सुधीर चांदूरकर, दिलीप हनवते, प्रशील सहारे, हरिश खान यांनी प्रयत्न केले.


Advertisement
Advertisement