कन्हान :येथील पोलीस स्टेशनचे वादग्रस्त थानेदार रविंद्र गायकवाड यांची तडाकाफडकी उचलबांगडी करून थानेदार पद्दी चंद्रकात काळे यांची नियुक्ती करण्यात आली. थानेदार काळे यांनी आज थानेदार पदाचा पदभार सांभाळला.
कन्हान पोलीस स्टेशनला नोंहेबर २०१६ मघ्ये रविंद्र गायकवाड थानेदार म्हणुन रूजु झाले होते. त्यांचा कारकिर्दीत चार मोठे देशी कट्टा कांड झाल्यामुळे त्यांची कारकिर्द झाकोळल्या गेली होती. अवैध धंदयाना आश्रय पोलीस नागरिक सुसंवादाची कमी यामुळे त्यांच्या विषयी नागरिकांमध्ये तिव्र रोष निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या संपुर्ण बाबीची द़खल घेत तडकाफडकी रविंद्र गायकवाड यांची थानेदार पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर वाहतुक शाखेचे प्रमुख चंद्रकात काळे यांची नियुक्ती केली.
चंद्रकात काळे यांनी वाहतुक शाखेत काम करत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा यशस्वीरित्या पार पाडला होता.यापुर्वी काळे यांनी नागपूर शहरात पाचपावली, अंबाझरी, सक्करदरा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक तर चंद्रपुर शहरात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये थानेदार म्हणुन यशस्वी कारकिर्द पुर्ण केली. पदभार सांभाळल्यानंतर पत्रकाराशी बोलतांना त्यानी पोलीस नागरिक सुसंवाद, गुप्तवार्ता विभागाचे बळकटीकरण, गुन्हेगारी वर अंकुश या गोष्टीवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.










