वाड़ी(अंबाझरी): वाड़ी नप क्षेत्रात गत 15 दिवसापासून डेंग्यूने नागरिकांना त्रस्त केले .त्या मुळे शांत असलेल्या कॉंग्रेस ला नागरिकांची ही स्थिती न बघितल्या गेल्याने सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पूर्व सूचना देऊन बुधवारी मोठ्या संखेने नप ला पोहचुन डेंग्यु वाड़ीत कसा पसरला? नपने धड़क उपाय योजना का केली नाही ? याची विचरणा केली.न प चे मुख्याधिकारी राजेश भगत हे नागपुरला जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला गेल्याने ,उपमुख्याधिकारी श्री आकाश सहारे यांनी कोंग्रेस चे निवेदन स्वीकारले, या चर्चेत काँग्रेस पदाधिकारी यांनी डेंग्यु मुळे अनेक नगरात घबराहट पसरल्याचे सांगून विविध खाजगी रुग्णालयात ताप व डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.
अनेक रुग्ण उपचारा साठी नागपुर व लता मंगेशकर रुग्णालयात दाखल आहे.वाड़ीत नप तसचे व्याहड़ पि एस सी तर्फेही वेळेत उपाय करण्यात आले नाही व त्यामुळेच हा आजार वाडीत पसरला याला न प जबाबदार आहे.असा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला,उपमुख्याधिकारी सहारे यांनी सांगितले की नप कड़े दोनच फॉगिंग मशीन आहे, वाड़ीचा विस्तार लक्षात घेता त्या कमी आहेत.त्यामुळे तातडीने जिल्हा प्रशासनाला मदत व साधनाची मागणी करण्यात येईल.कचरा असलेल्या ठिकाणी औषध फवारनी वाढविन्यात येईल,आशा वर्कर घरोघरी जाऊंन माहिती गोळा करीत असल्याची माहिती त्यांनी दिली,परंतु या आशा वर्कर्स कड़े काहीही साधने नसल्याची बाब शिष्टमंडळांनी उघड केली.
एकुनच नपने वेळेत उपाय सुरु केले नाही या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन तातडीने धड़क मोहीम सुरु करण्याची मागणी चर्चेत केली.कोणतेही मुख्य पदाधिकारी या वेळी न प मधे उपस्थित नव्हते.या प्रसंगी वाडी शहर काँग्रेस कमिटीचे वतीने नागपूर ता.ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश कोकाटे,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराणे उपाध्यक्ष प्रशांत कोरपे,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अश्विन बैस, माजी प.स.सभापती प्रमिलाताई पवार, माजी सरपंच भिमरावजी लोखंडे, बेबीताई ढबाले,नागोरावजी गवळी,किशोर नागपुरकर, गौतम तिरपुडे,निशांत भरबत,पुरूषोत्तम लिचडे,भिमरावजी कांबळे,शेषरावजी ठीसके, योगेश कुमकुमवार, विनोद पोहणकर,अाशिष पाटील,गणेश बावणे,नामदेव चौरे,मंगेश भारती,गोपाल वरठी,काळमेघजी,ई सहभागी झाले होते.