Published On : Fri, Sep 15th, 2017

साखर कारखान्याच्या ६२ कामगारांना थकीत वेतन मिळावुन देण्याकरिता आ. बच्चू कडू ला साकडे.

Advertisement

कन्हान : श्रीराम सहकारी साखर कारखाना बापदेव (पुर्वी चे नाव) येथील २९२ कामगारांचे थकीत वेतन व इतर देय नविन कारखाना मालकानी देण्याचे मान्य केले. पंरतु ६२ कर्मचा-याना वगळुन कामगारावर अन्याय केल्याने आमदार बच्चूभाऊ कडू याना थकीत वेतन मिळावुन देण्याकरिता ६२ कर्मचा-यांनी निवेदन देऊन साकडे घातले.

श्रीराम सहकारी साखर कारखाना, बापदेव (पुर्वीचे नाव) येथील ६२ कर्मचारी कामगार असुन व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लि. बापदेव तालुका मौदा (नवीन नाव) या कारखानदार कडुन आम्हच्या वर अन्याय झाला आहे.तो असाकी नवीन कारखाना कम्पनी यांनी जुन्या कर्मचा-यांचे थकीत वेतन व इतर देय रक्कम देण्याचे मान्य केले. व याकरिता २९२ कामगाराची यादी बनविण्यात आली, परंतु आम्हा ६२ कर्मचा-यांना वगळण्यात आले. यासंबंधी दि. १२ जुन २०१४ पासुन ते दि.१६ जुन २०१६ पर्यंत मा. मुख्यमंत्री साहेब, मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी, मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर कारखाना) नागपुर, मा. सहकार मंत्री, मा. तहसिलदार मौदा हयाना न्याय मिळवून देण्याकरिता निवेदन देऊन विनती करण्यात आली. परंतु न्याय मिळाला नसल्यानेच शेतकऱ्याचे, शेतमजुरांचे, कर्मचा-यांचे हुदय स्थान मा.आमदार बच्चूभाऊ कडु संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटना यांचे कडे रामटेक विधानसभा प्रमुख मा.रमेशभाऊ कारेमोरे यांचे मार्फत दि. ७ जुन २०१७ ला निवेदन दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मा बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहाराने मा. उपविभागीय अधिकारी मौदा यांनी दि. १ ऑगस्ट २०१७ ला श्री हेमंत बरबटकर, प्रशासन, व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लि. बापदेव, विजय मालपे व माजी अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची सभा घेण्यात आली. त्यावेळेस कार्यरत असलेल्या व्यवस्थापना कडुन २९२ कर्मचा-यांची यादी बनविण्यात आली परंतु ती प्रसिध्दी करण्यात आली नाही.यामुळेच ६२ कर्मचा-यांना वगळण्यात आले. जेव्हा की या कर्मचा-याचे भविष्य निधी कपात करण्यात आली आहे. यामुळेच या ६२ कर्मचारी व कुटुंबावर अन्याय झाला आहे.

मा उपविभागीय अधिकारी मौदा यांनी मा जिल्हाधिकारी नागपुर व संबंधित अधिकारी यांना पत्र देऊन सदर कर्मचारी कंपनीत कार्यरत असताना त्याचा कर्मचारी भविष्य निधी कपात करण्यात येत होता. असे असताना त्याचे यादीत नाव असणे अपेक्षित होते. परंतु यादीत नाव नसल्यानेच त्याना थकित वेतनाची व इतर रक्कम मिळु शकली नाही. यास्तव त्यांचे बाबत सहानुभूती पुर्वक विचार करून त्यांना थकीत वेतनाची व इतर रक्कम देण्यात हरकत नाही.

या आशयांचे पत्र क्र./प्रस्तु-१/उविअ/मौदा /कावि ७४५/२०१७ दिनाक १४/८/२०१७ संदर्भीय पत्राच्या अनुसंगाने कर्मचा-यांच्या आशा पल्लवीत झाल्याने सोमवार दि. ११सप्टेंबर ला रवीभवन नागपुर येथे मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन निवेदन देऊन साकडे घातले असता मा. बच्चूभाऊ मा. सहकार मंत्री, मा. सहकार राज्यमंत्री महोदय सोबत लवकरच भेट घेऊन सभा घेण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मा. आमदार बच्चूभाऊ कडु, रमेशभाऊ कारेमोरे, देवेंद्रभाऊ गोडबोले व इतर पदाधिकारी यांचे कर्मचारी प्रतिनिधीनी विजय मालपे, चंद्रशेखर लौटावार, दिलीप इंगळे, प्रेमविलास सातपुते, वामन देशमुख, पंढरी सरोदे, श्रीमोहन धांडे, आंनदराव ढोमणे, राजाराम कोल्हे आदीने अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement