Published On : Mon, Sep 11th, 2017

ओरियंटल कंपनीचे चारप़दरी महामार्गाच्या देखभाली कडे दुर्लक्ष.

कन्हान : वर्धा रोड ते टेकाडी स्टाँप नागपूर बॉयपास व टेकाडी स्टाँप ते मनसर चारपदरी महामार्ग रस्ता ओरिंयटल व ब़ँकबॉन कंपनी व्दारे बीओटी तत्त्वावर कऱण्यात आले. असुन मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येत आहे. परंतु हया चारपदरी महामार्गावरिल अतिआवश्यक फोन व्यवस्था कंपनीच्या देखभालीच्या दुर्लक्षित पणामुळे पांढरा हत्ती ठरत आहे.

नागपुर जबलपूर राष्ट्रीय चारप़दरी महामार्ग क्र. ४४ चे ओरियंटल व बँकबोन कंपनीच्या व्दारे बनविण्याचे काम करण्यात आले. या महामार्गावरिल सुचना फलक व्यवस्थित नाही आहेत. महामार्गावरिल डाबरीकरण खोलगट, उचवट झाल्याने रस्ता झिकझाग झाल्याने वाहन चालवताना चालकाना त्रास सहन करावा लागत असून कधी कधी अपघातास बळी पडावे लागते.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघात झाल्यावर रूग्णवाहीका बोलविण्या करिता, पोलीसांना माहीती देऊन त्यांना पाचारण करण्याकरिता फोन करण्याकरिता भटकावे लागते कारण चारप़दरी महामार्गावरिल अतिआवश्यक फोन नादुरुस्त असल्याचे दर्शवुन दुरूस्ती करिता नेल्या पासुन डब्यातून गायब झालेले आहेत.

या चारप़दरी महामार्गावरिल एकही फोन सुरू नसुन फक्‍त खाली डब्बे लागले असल्याने पांढरा हत्ती झाला आहे.

यामुळे ओरियंटल कंपनी व्दारे जसे टोल वसुली जोमाने करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे चारप़दरी महामार्गाची व्यवस्थित देखभाल नियमीतपणे करून प्रवाश्याना सोयी सुविधांची पुरविण्यात याव्या अशी मागणी चारप़दरी महामार्ग परिसरातील नागरिकांनी व प्रवाश्यानी कंपनी व शासना कडे केली आहे.

Advertisement
Advertisement