Published On : Wed, Aug 30th, 2017

गणेशाेत्सवानंतर राज ठाकरे करणार मनसेची पुनर्प्रतिष्ठापना, मनपा पराभवानंतर झाडून बैठका

Advertisement

नाशिक: एकेकाळी एेनभरात असताना विधानसभेचे शहरातील तिन्ही मतदारसंघांबराेबरच महापालिकेची सत्ता मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कालांतराने नानाविध कारणामुळे झालेल्या पडझडीनंतर संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी राज ठाकरे हे गणेशाेत्सवानंतर नाशिकमध्ये तळ ठाेकणार अाहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका लावून दिला असून, अाता वाॅर्डनिहाय प्रमुखापासून तर शहर कार्यकारिणीतील महत्त्वाच्या पदांची पुनर्रचना सुरू अाहे.

राज यांनी शिवसेना साेडल्यानंतर तडक नाशिक गाठले हाेते. सेनेत असताना नाशिकवर लक्ष असल्यामुळे मनसे उभारणीत त्यांना फायदा झाला. सेनेचे अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्यासाेबत अाले हाेते. नाशिककरांनीही राज यांच्यावर विश्वास दाखवत तिन्ही विधानसभा मतदारसंघ महापालिकेची सत्ता दिली. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर राज यांचे झालेले दुर्लक्ष, संघटनात्मक कुरघाेडीत केलेल्या कामांचे याेग्य पद्धतीने ब्रँडिंग करता अाले नाही. महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राज यांनी सीएसअार अॅक्टिव्हिटीतून बाॅटनिकल गार्डन, स्व. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, गाेदावरीवरील रंगबेरंगी पाण्याचा पडदा, जिनिव्हा फाउंटनच्या धर्तीवर उंच कारंजा यासह अनेक महत्त्वाची कामे केली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. मनपा निवडणुकीनंतर मनसेचा अाकडा ४० वरून इतका झाला. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर मुंबई, ठाणे, पुण्याच्या बांधणीवर राज यांनी लक्ष केंद्रित केले हाेते. प्रामुख्याने पक्षबांधणीत तळाकडील कार्यकर्त्यापर्यंत पाेहाेचण्याचा त्यांचा प्रयत्न हाेता. ताेच पॅटर्न नाशिकमध्ये राबवला जाणार असून, राज यांनी त्यासाठी गणेशाेत्सवानंतरचा मुहूर्त निवडला अाहे. मात्र तत्पूर्वी स्थानिक पातळीवर अावश्यक बांधणीसाठी प्रदेश उपाध्यक्ष तथा महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले पालिकेतील गटनेते सलीम शेख यांनी प्रयत्न सुरू केले अाहेत. या दाेन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या ‘राजगड’ कार्यालयात साेमवारपासून विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू झाल्या. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात खुद्द ढिकले यांचीच प्रमुख दावेदारी असल्याने बैठकीचा श्रीगणेशाही त्यांच्यापासूनच झाला अाहे.

Advertisement
Advertisement
Advertisement