Advertisement
मुंबई: व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वागत करत असल्याचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. हा निकाल ऐतिहासिक असून या निकालामार्फत मोदी सरकारला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
व्यक्तीगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार नाही, अशी बाजू सरकार मांडत होते. न्यायालयाने सरकारच्या या दाव्याला चपराक लगावली आहे. आधार कार्डच्या माध्यमातून जमा केलेली लोकांची व्यक्तीगत माहिती केंद्र सरकारकडून इतर खासगी कंपन्यांना पुरवली जात होती. केंद्र सरकारच्या या कारभाराला या निकालामुळे लगाम लागेल, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.