Published On : Thu, Apr 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात जिममधील अतिव्यायामामुळे तरुणाला मेंदूचा झटका; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार करून डॉक्टरांनी वाचवले प्राण

Advertisement

नागपूर : फिटनेसच्या नादात मर्यादा ओलांडणारा व्यायाम किती घातक ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण शहरात समोर आले आहे. अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटून अर्धांगवायूचा झटका आलेल्या २३ वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी वेळीच उपचार देत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम भोयर हा तरुण १० एप्रिल रोजी जिममध्ये दीर्घकाळ व्यायाम करून घरी परतला. काही वेळातच त्याची प्रकृती अचानक खालावली आणि तो बेशुद्ध पडला. त्याची आई आरती भोयर या नर्स असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वैद्यकीय मदत मिळवली.

Gold Rate
Apr 24 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रुग्णाची तपासणी केल्यानंतर मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन रक्ताची गुठळी तयार झाल्याचे निष्पन्न झाले. परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ‘इंडोव्हॅस्क्युलर’ पद्धतीने ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

या प्रक्रियेत पायातील रक्तवाहिनीतून कॅथेटर मेंदूपर्यंत पोहोचवून गुठळी काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत झाला आणि रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. काही दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेतल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत ओम पूर्णपणे सावरला. विशेष म्हणजे, स्ट्रेचरवर रुग्णालयात दाखल झालेला ओम २१ एप्रिल रोजी स्वतःच्या पायावर चालत घरी परतला.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या रुग्णांसाठी पहिले ६ तास अत्यंत महत्त्वाचे ‘गोल्डन अवर’ असतात. या काळात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

दरम्यान, डॉक्टरांनी तरुणांना इशारा देत सांगितले की, जिममध्ये व्यायाम करताना अतिरेक टाळणे आवश्यक आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय तपासणीनंतरच व्यायाम करावा, अन्यथा अशा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement