Published On : Wed, Apr 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा भंडाफोड; 40 लाखांची रोकड जप्त, दुबई कनेक्शन समोर!

Advertisement


नागपूर – नागपूर येथे आयपीएल सामन्यांवर चालणाऱ्या मोठ्या सट्टेबाजी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रतापनगर पोलिसांनी अंबाझरी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकत तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली.

या प्रकरणात अमन पाठक हा मुख्य आरोपी असून, यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याला इतर साथीदारांसह अटक केली होती. पुढील चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे ‘एस.के.’ नावाच्या कथित सूत्रधारापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या सूचनेनुसारच फ्लॅट भाड्याने घेऊन सट्टेबाजीचे व्यवहार सुरू होते, असे तपासात उघड झाले आहे.

या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय संबंधही समोर आले असून दुबई येथून संचालन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सट्टेबाजीसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून व्यवहार केले जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, अमन पाठक याची कोठडी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून फरार असलेल्या ‘एस.के.’चा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement