Published On : Mon, Apr 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पँगोलिन तस्करीचा पर्दाफाश ; नागपूर डीआरआयची छत्तीसगडमध्ये धडक कारवाई; तिघे जेरबंद

Advertisement

नागपूर : वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कामगिरी करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर विभागाने छत्तीसगडमधील जगदलपूर येथे मोठी कारवाई करत पँगोलिन (खवले मांजर) तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले. या धाडीत तब्बल १६ किलो ५२८ ग्रॅम खवले जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने जगदलपूर शहरात सापळा रचत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले आरोपी अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या बेकायदेशीर व्यापारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त माल आणि आरोपींना पुढील चौकशीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कायदेशीर संरक्षण अत्यंत कडक-
भारतीय खवले मांजर (Manis crassicaudata) हा प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे वाघाप्रमाणेच त्याला सर्वोच्च संरक्षण मिळाले असून, याची शिकार किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

तस्करीमागील कारण काय?
पँगोलिनच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्झरी वस्तू आणि पारंपारिक औषधांसाठी याला मोठी मागणी असल्याने तस्कर या प्राण्यांची निर्दयी शिकार करतात.

डीआरआयची आक्रमक मोहीम कायम-
२०२५ पासून नागपूर डीआरआयने वन्यजीव तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. विविध राज्यांत पसरलेल्या तस्करीच्या जाळ्यांवर त्यांनी घाव घातला आहे. ताज्या कारवाईमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय काळ्या बाजाराला मोठा धक्का बसला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement