Published On : Mon, Mar 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘पाणी हेच जीवन’ चा संदेश देत चिमुकल्यांनी काढली रॅली

ऑरेंज सिटी वॉटर अन् ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या संयुक्त उपक्रमाला उत्तम प्रतिसाद
Advertisement

नागपूर, – पाणी हेच जीवन आहे आणि त्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे! हाच विचार सर्वसामान्य नागरिकांच्या, विशेषतः तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी ‘ऑरेंज सिटी वॉटर’ (OCW) आणि ‘ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक जल दिना’निमित्त कैकाडी नगर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमांतर्गत ‘पाणी हेच जीवन’चा संदेश देत चिमुकल्यांनी रॅली काढली. या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. केवळ रॅलीच नव्हे, तर मुलांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेली जलसंधारणाची चित्रे आणि प्रभावी घोषणांची पोस्टर्स यांद्वारे पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. शाश्वत भविष्यासाठी पाण्याचे रक्षण करणे किती गरजेचे आहे, हे चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

Gold Rate
Mar 232026 - Time 10.20Hrs
Gold 24 KT ₹ 1,40,300 /-
Gold 22 KT ₹ 1,30,500 /-
Silver/Kg ₹ 2,16,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय ‘ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन’च्या तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत ‘जागतिक जल दिन २०२६’ची ‘Water & Gender’ ही थीम याबाबतही माहिती दिली. पाणी व्यवस्थापनात महिलांची भूमिका, तसेच पाणी उपलब्धतेतील लैंगिक असमानता या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, पाणी जपून वापरणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, दैनंदिन जीवनात छोटे-छोटे बदल करून पाणी कसे वाचवावे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.

 

“आम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरू आणि जलसंधारणासाठी सदैव कटिबद्ध राहू,” असा निर्धार यावेळी करण्यात आला. यामुळे जलसंधारणाच्या चळवळीला स्थानिक पातळीवर मोठी उभारी मिळाली असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement