Published On : Mon, Mar 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

घरात जास्त गॅस सिलिंडर ठेवणे पडू शकते महागात; नियम काय सांगतात ते जाणून घ्या?

Advertisement

नागपूर – गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्यावर अनेकजण सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात जादा एलपीजी सिलिंडर ठेवण्याचा विचार करतात. मात्र अशा प्रकारे अतिरिक्त सिलिंडर साठवणे केवळ धोकादायकच नाही, तर कायद्याच्या दृष्टीनेही चुकीचे ठरू शकते. त्यामुळे घरगुती ग्राहकांना किती सिलिंडर ठेवण्याची मुभा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

घरगुती कनेक्शनसाठी मर्यादा किती?
तेल कंपन्यांच्या नियमानुसार एका घरगुती गॅस कनेक्शनवर फक्त दोन 14.2 किलोचे सिलिंडर ठेवण्याची परवानगी आहे. त्यापैकी एक सिलिंडर वापरात असतो, तर दुसरा अतिरिक्त म्हणून ठेवता येतो. या मर्यादेपेक्षा जास्त सिलिंडर घरात आढळल्यास ती बेकायदेशीर साठवणूक समजली जाते.

Gold Rate
Mar 16 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800 /-
Silver/Kg ₹ 2,56,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नियम मोडल्यास कारवाईची शक्यता-
एलपीजी गॅस हा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत येतो. त्यामुळे त्याची अनधिकृत साठवणूक केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास काही महिन्यांपासून ते अनेक वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच आर्थिक दंड होण्याची शक्यता असते. याशिवाय जास्तीचे सिलिंडर प्रशासनाकडून जप्तही केले जाऊ शकतात.

सुरक्षिततेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा-
गॅस सिलिंडर ठेवताना काही मूलभूत सुरक्षितता नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सिलिंडर नेहमी हवेशीर जागेत ठेवावा आणि बंद जागा किंवा तळघरात ठेवणे टाळावे. तसेच उष्णता, आग किंवा विजेच्या उपकरणांच्या जवळ सिलिंडर ठेवू नये.

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर गुन्हा-
घरगुती गॅसचा वापर हॉटेल, ढाबे किंवा रस्त्यावरील खाद्यगाड्यांमध्ये करणे कायद्याने मनाई आहे. असे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन-
गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासन आणि तेल कंपन्या प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जादा सिलिंडर साठवण्याऐवजी आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement