Published On : Wed, Feb 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात जेलमधून सुटल्यानंतर आरोपी पुन्हा चोरीच्या मार्गावर; दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

Advertisement

नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी कोहाडकरपेठ परिसरात राहणाऱ्या वंदना पराते यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी सेंधमारी करून घरातील सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पाचपावली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

Gold Rate
Feb 25th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,800 /-
Gold 22 KT ₹ 1,49,500 /-
Silver/Kg ₹ 2,70,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान लष्करी बाग परिसरातील कोलकाता रेल्वे लाईनजवळ विनानंबर बर्गमन दुचाकीवरून संशयास्पद हालचाल करणारे दोन तरुण पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींची नावे आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर आणि पलाश चेतन भिमटे अशी निष्पन्न झाली. तपासात उघड झाले की मुख्य आरोपी आदित्य हा दोन महिन्यांपूर्वीच ‘एमपीडीए’ अंतर्गत शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला होता. सुटकेनंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत साथीदाराच्या मदतीने शहरात घरफोड्यांच्या घटना घडवण्यास सुरुवात केली होती.

सखोल चौकशीत दोघांनीही कोहाडकरपेठ येथील घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या निशाणदेहीवरून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. घरफोडीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ही जुनी कामठी परिसरातून चोरीस गेल्याचेही समोर आले असून तीही जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांनी नागरिकांना घरांची सुरक्षितता वाढवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement