
नागपूर : अंबाझरी तलावातील जलपर्णी काढून टाकण्याच्या मोहिमेला घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आजपासून (ता. 23) सुरूवात झाली आहे. यामुळे अंबाझरी तलावातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अंबाझरी तलावाची पाहणी करून जलपर्णी युद्धपातळीवर काढण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते. त्याचप्रमाणे अंबाझरी तलावात येणार्या दूषित पाण्याचा प्रवाह बंद करण्याची सूचना केली होती.
महापौरांच्या निर्देशानंतर आजपासून (ता. 23) अंबाझरीतील जलपर्णी निर्मूलन मोहिमेला सुरूवात झाली. घनकचरा व्यवस्थापन विभागाने चार पोकलेन मशीनच्या सहाय्याने जलपर्णी काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे. जलपर्णीमुळे अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानंतर जलपर्णी काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला गरज पडल्यास पोकलेनच्या संख्येत वाढ केली जाईल, अशी माहिती धरमपेठ झोनचे अधिकारी श्री. लोकेश बासनवार यांनी दिली.








