Published On : Sat, Feb 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर हालचाली वाढल्या;१० फेब्रुवारीला मोठा निर्णय?

सुनील तटकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
Advertisement

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणाबाबत पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या ताज्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “आम्ही सर्वांनी एकमताने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरणासारखा विषय अत्यंत संवेदनशील असून, तो सविस्तर विचारविनिमयानंतरच ठरवला जाईल.”

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१० फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याने, त्या वेळी विलीनीकरणावर चर्चा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची शक्यता असून, त्या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याचीही चर्चा आहे.

“योग्य वेळ येताच सर्व संबंधित नेते एकत्र बसून या विषयावर निर्णय घेतील,” असे संकेत देत तटकरे यांनी थेट भूमिका स्पष्ट करणे टाळले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये या मुद्द्यावर भिन्न मतप्रवाह दिसून येत आहेत. अजित पवार गटातील काही नेते विलीनीकरणाबाबत साशंक असल्याचे संकेत देत आहेत, तर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांची भूमिका एकत्रिकरणास अनुकूल असल्याचा दावा करत आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement