
नागपूर – महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी १.३० वाजेपर्यंत अंदाजे २६.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिकांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. मात्र, काही प्रभागांत मतदान टक्केवारी तुलनेने कमी असल्याचे मतप्रक्रियेसंदर्भात अधिक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज आहे.
मतदान केंद्रांवर सुरक्षेची व व्यवस्थेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, मतदारांनी वेळेत मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
Advertisement








