
नागपूर : प्रभाग क्रमांक २८ मधील आराधना नगर परिसरात असलेल्या जीआरके कॉन्व्हेंट येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. सकाळी मतदान सुरू होण्याच्या वेळेतच मशीनमध्ये दोष आढळून आल्यामुळे काही काळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली.
सदर बिघाडामुळे सुमारे ४० मिनिटे मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत ईव्हीएम मशीन बदलण्याची कार्यवाही केली. नवीन मशीन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे.
मतदानातील अडथळ्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या मतदान शांततेत सुरू असून मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.
Advertisement








