Published On : Wed, Jan 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापालिका निवडणूक : १५ जानेवारी रोजी मतदानासाठी अधिकृत सुट्टी

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement

नागपूर : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी १५ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना काढण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा कामकाजाचा अडथळा येऊ नये आणि प्रत्येक मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावू शकेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी आवश्यक वेळ मिळणार आहे.

Gold Rate
Feb 25th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,800 /-
Gold 22 KT ₹ 1,49,500 /-
Silver/Kg ₹ 2,70,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकारच्या अधिसूचनेनुसार, महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमधील तसेच खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना १५ जानेवारी रोजी मतदानासाठी अवकाश देण्यात येणार आहे. मात्र, हा अवकाश केवळ महापालिका हद्दीपुरताच लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी १५ जानेवारी रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. या निर्णयामुळे राज्यात मतदानाचा उत्साह वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement