
वर्धा — जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावर बालरुग्ण विभागाजवळील रेकॉर्ड रूममध्ये आग लागली. आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले तरी सुदैवाने कोणीही जखमी किंवा मृत्यू झालेला नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा असूनही ती वेळेवर सुरू का करण्यात आली नाही, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे प्राथमिक अंदाज असून अधिक तपासणी सुरू आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचा इशारा दिला आहे.
Advertisement








