
नागपूर – महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत महायुतीने मोठा राजकीय दबदबा निर्माण केला आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार, एकूण जागांपैकी तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक ठिकाणी महायुतीचा विजय झाला असून, भारतीय जनता पक्षाने एकहाती १२९ नगराध्यक्ष आणि ३३०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणत राज्यभर निर्विवाद आघाडी घेतली आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय ‘टीम भाजपचा एकत्रित परिश्रम’ असल्याचे सांगितले. विकास, स्थैर्य आणि विश्वास या मुद्द्यांवर जनतेने स्पष्ट कौल दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भात भाजपने ५८ नगराध्यक्ष निवडून आणत आपला गड कायम राखला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही भाजपने १९ नगराध्यक्षांसह ठसा उमटवला. कोकणात मात्र शिवसेना (शिंदे गट) १० नगराध्यक्षांसह आघाडीवर राहिली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना मिळूनही ५० नगराध्यक्षांचा टप्पा पार करता आलेला नाही.
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक २०२५ : विभागनिहाय चित्र-
विदर्भ (१०० जागा)
भाजप ५८ | काँग्रेस २३ | शिवसेना (शिंदे) ८ | राष्ट्रवादी (अजित पवार) ७ | इतर ४
पश्चिम महाराष्ट्र (६० जागा)
भाजप १९ | शिवसेना (शिंदे) १४ | राष्ट्रवादी (अजित पवार) १४ | इतर ६ | काँग्रेस ३
मराठवाडा (५२ जागा)
भाजप २५ | शिवसेना (शिंदे) ८ | राष्ट्रवादी (अजित पवार) ६ | काँग्रेस ४ | शिवसेना (ठाकरे) ४
उत्तर महाराष्ट्र (४९ जागा)
भाजप १८ | शिवसेना (शिंदे) ११ | राष्ट्रवादी (अजित पवार) ७ | काँग्रेस ५ | इतर ५
कोकण (२७ जागा)
शिवसेना (शिंदे) १० | भाजप ९ | इतर ४ | शिवसेना (ठाकरे) २
एकूण नगराध्यक्ष (२८८)
भाजप १२९ | शिवसेना (शिंदे) ५१ | राष्ट्रवादी (अजित पवार) ३५ | काँग्रेस ३५ | इतर २२
नगरसेवक संख्या – पक्षनिहाय
भाजप ३३२५ | शिवसेना (शिंदे) ६९५ | शिवसेना (ठाकरे) ३७८ | राष्ट्रवादी (अजित पवार) ३११ | काँग्रेस १३१
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२०१७ मध्ये भाजपचे १६०२ नगरसेवक होते, आज ही संख्या ३३२५ वर पोहोचली आहे. हा विजय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपच्या विकासाभिमुख राजकारणावर जनतेचा विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी ही मोठी नांदी ठरेल.








